Wednesday, August 12, 2015

विचारधन 1

🌻विचारधन🌻

" इंग्रजी माध्यमात शिकून  बेगडी मोठेपणा मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सिंहाचेे कातडे पांघरून जंगलाच्या राजाचा मान मिळविण्याची अपेक्षा करण्यासारखे हास्यास्पद आहे.....!!!"

==========================

✏ राहुल पाटील
09423628387
🚩मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण🚩
🚩मराठी शाळांचे शिलेदार समुह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀

🌻विचारधन🌻

" एखाद्या भाषेस जे स्थान प्राप्त होते त्याच्यामागे ती भाषा वापरणा-यांचे महात्म्य असते. भाषेमुळे लोक मोठे होत नाहीत तर लोकांमुळे भाषा मोठी होते....!!!"

==========================

✏ राहुल पाटील
09423628387
🚩मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण🚩
🚩मराठी शाळांचे शिलेदार समुह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀

🌻विचारधन🌻

" आज स्वातंत्र्य दिवस सर्वत्र साजरा होतांना.. या इंग्रजी भाषेच्या जगात, ती भाषा न येणारा मुका, बहिरा व निरक्षर होतो. त्याला मनातले बोलता येत नाही, लिहीलेले वाचता येत नाही.
             इंग्रजी जाणणारी जनता ३%हून खमी आहे. आमची ९७% टक्के जनता सध्या परिस्थितीमुळ मुकी, बहिरी व अपंग झिली आहे.......!!!"

🙏स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा🙏

==========================

✏ राहुल पाटील
09423628387
🚩मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण🚩
🚩मराठी शाळांचे शिलेदार समुह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀

🌻विचारधन🌻

" लोकभाषा ही दैनंदिन व्यवहारात जर नसेल तर लोकशाही ख-या अर्थाने असूच शकत नाही. म्हणून कायद्याने लोकभाषेचा वापर करावयास भाग पाडणे हे लोकशाहीसाठी अपरिहार्य आहे........!!!!

==========================

✏ राहुल पाटील
09423628387
🚩मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण🚩
🚩मराठी शाळांचे शिलेदार समुह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀

Monday, August 3, 2015

Sunday, August 2, 2015

आपण इंग्रजी शिकताना एकदम शिकलो नव्हतो!


आपण इंग्रजी शिकताना एकदम शिकलो नव्हतो!

प्रथम ५ वी पर्यंत फक्त मराठी : त्यामध्ये ४ थी ला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये मराठी एकदम पक्के व्हायचे!                         
५ वी नंतर हळू हळू, इंग्रजी ला सुरुवात झाली. आपण मराठीत विचार करायचो, वाक्य तयार करायचो आणि मग इंग्रजीमध्ये बोलायचो, थोडेसे अडखळतच; आणि मग सततच्या वाचण्यामुळे/बोलण्याच्या प्रयत्नामुळे भाषा अजून चांगली यायला लागली… हा एका रात्रीचा प्रवास नक्कीच नाही. या प्रवासामधले मराठीचे योगदान सुद्धा कमी नाही.
आता आपल्या मुलांना जर एकदम इंग्रजी माध्यमामध्ये टाकले तर त्यांना हा बदल किती अवघड जात असेल? त्या बिचाऱ्यांचे  तर मराठी सुद्धा पक्के झालेले नसते आणि अशा अवस्थेत सरळ इंग्रजी शिकायचे/बोलायचे! लहान मुलांना कोणतीही भाषा लगेच जमते हे अर्ध सत्य आहे. इंग्रजी भाषा किंवा अन्य कोणतीही भाषा टप्प्या टप्प्याने शिकवले जाते, आणि इंग्रजी मधून विषय पूर्ण इंग्रजीमधून मुलांच्या समोर ठेवले जातात हा या दोन गोष्टींमधला मूलभूत फरक आहे.
शिवाय घरी इंग्रजी वातावरण नसेल तर हा बदल तेवढा सोपा राहत नाही.
त्यात इंग्रजी  नाही बोलले तर काही शाळा प्रत्येक दिवशी कमीत कमी २०-३० रुपये दंड ठोठावतात ! माझ्या मित्राचा मुलगा तर आईला म्हणाला कि आई, माझ्याच्याने इंग्रजी बोलून होणार नाही तू रोज २० रुपये माझ्या खिशात ठेवत जा !!! एवढ्या कमी वयात मुलांवर एवढा ताण? आणि काय मिळवतो आपण? थोडीशी प्रतिष्ठा? कि स्वतःचे कौतुक! - चला मी इंग्रजी माध्यमामध्ये मुलाला घातले आहे, उज्वल भविष्याची १००% हमी!!!!!!
मग! ५०-६० हजार फी भरतोय! उज्वल भविष्य तर ठरलेलेच आहे !!!!!!
एक सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवावे..
|| घरी दारी मराठी असेल, तर इंग्रजी शाळा नको ||
|| इंग्रजी शाळा असेल, तर घरी दारी मराठी नको ||
यावर सर्वांनीच विचार करावा..
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
✏सुचिकांत
९०५२३४४४७६
मराठी शाळांचे शिलेदार समूह
