Monday, August 3, 2015

मातृभाषेवर बंदी

==================
मातृभाषेवर बंदी
==================

इंग्रजी शिकायचं ना, तर मग शाळेत आल्यावर मातृभाषा बोलायची नाही, बोलली तर दंड😳
अशा प्रकारची सक्ती केली, नियम घातले तर मुलं इंग्रजी काय, धड मराठी तरी बोलतील का?
आपल्या मेंदूत अनेक भाषा शिकण्याची यंत्रणा आहे. मात्र काही 'इंग्रजी शाळांचे' नियम या यंत्रणोला पूरक नाहीत, तर ते स्पष्टपणो बाधकच आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे, इंग्रजी शिकताना मातृभाषेत बोलण्यासाठी घातलेली बंदी. शाळेत नुकत्याच प्रवेश घेतलेल्या मुलांची मातृभाषा किंवा घरभाषा ही जास्त पक्की असते. साहजिकच सवयीनं उत्स्फूर्तपणो त्यांना ती भाषा बोलता येते. मात्र शाळेच्या परिसरात केवळ इंग्रजीच बोलायचं, तसेच तीन वेळा मातृभाषेत बोललेलं चालू शकतं. मात्र चौथ्यांदा बोलल्यास शिक्षा केली जाते. काही शाळांमध्ये लहान गटांर्पयत मातृभाषेत बोललेलं चालतं. पुढे मात्र इंग्रजीची सक्ती केली जाते. शाळेचे असले नियम मुलांच्या संवादकौशल्यात बाधा आणतात. इंग्रजी भाषेतच बोलायची सक्ती असते तेव्हा संवादकौशल्य, विचारशक्ती अशा भविष्यात व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवरच आघात होतो. हा प्रश्न केवळ मूठभर मुलांचा नाही, तर आज इंग्रजी माध्यमाच्या कित्येक शाळांमध्ये अशी बंदी/सक्ती आहे. त्यात शिक्षण घेणारी लाखो मराठी/ हिंदी/ इतर भाषिक मुलं गप्प आहेत. त्यांचे विचार खुंटताहेत.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
# डॉ. श्रुती पानसे
# सौ. लोकमत
# मराठी शाळांचे शिलेदार समूह

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.