आपण इंग्रजी शिकताना एकदम शिकलो नव्हतो!
आपण इंग्रजी शिकताना एकदम शिकलो नव्हतो!
५ वी नंतर हळू हळू, इंग्रजी ला सुरुवात झाली. आपण मराठीत विचार करायचो, वाक्य तयार करायचो आणि मग इंग्रजीमध्ये बोलायचो, थोडेसे अडखळतच; आणि मग सततच्या वाचण्यामुळे/बोलण्याच्या प्रयत्नामुळे भाषा अजून चांगली यायला लागली… हा एका रात्रीचा प्रवास नक्कीच नाही. या प्रवासामधले मराठीचे योगदान सुद्धा कमी नाही.
आता आपल्या मुलांना जर एकदम इंग्रजी माध्यमामध्ये टाकले तर त्यांना हा बदल किती अवघड जात असेल? त्या बिचाऱ्यांचे तर मराठी सुद्धा पक्के झालेले नसते आणि अशा अवस्थेत सरळ इंग्रजी शिकायचे/बोलायचे! लहान मुलांना कोणतीही भाषा लगेच जमते हे अर्ध सत्य आहे. इंग्रजी भाषा किंवा अन्य कोणतीही भाषा टप्प्या टप्प्याने शिकवले जाते, आणि इंग्रजी मधून विषय पूर्ण इंग्रजीमधून मुलांच्या समोर ठेवले जातात हा या दोन गोष्टींमधला मूलभूत फरक आहे.
शिवाय घरी इंग्रजी वातावरण नसेल तर हा बदल तेवढा सोपा राहत नाही.
त्यात इंग्रजी नाही बोलले तर काही शाळा प्रत्येक दिवशी कमीत कमी २०-३० रुपये दंड ठोठावतात ! माझ्या मित्राचा मुलगा तर आईला म्हणाला कि आई, माझ्याच्याने इंग्रजी बोलून होणार नाही तू रोज २० रुपये माझ्या खिशात ठेवत जा !!! एवढ्या कमी वयात मुलांवर एवढा ताण? आणि काय मिळवतो आपण? थोडीशी प्रतिष्ठा? कि स्वतःचे कौतुक! - चला मी इंग्रजी माध्यमामध्ये मुलाला घातले आहे, उज्वल भविष्याची १००% हमी!!!!!!
मग! ५०-६० हजार फी भरतोय! उज्वल भविष्य तर ठरलेलेच आहे !!!!!!

एक सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवावे..
|| घरी दारी मराठी असेल, तर इंग्रजी शाळा नको ||
|| इंग्रजी शाळा असेल, तर घरी दारी मराठी नको ||
|| इंग्रजी शाळा असेल, तर घरी दारी मराठी नको ||
यावर सर्वांनीच विचार करावा..
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
✏सुचिकांत
९०५२३४४४७६
मराठी शाळांचे शिलेदार समूह
✏सुचिकांत
९०५२३४४४७६
मराठी शाळांचे शिलेदार समूह
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.